AI प्लेलिस्ट जनरेटर

AI प्लेलिस्ट जनरेटरने प्लेलिस्ट कशी तयार करायची?

खास तुमच्यासाठी तयार केलेली प्लेलिस्ट शोधायला तयार आहात? फक्त प्लेलिस्ट टॅब उघडा आणि AI प्लेलिस्ट बटण निवडा. तुम्हाला काय हवे आहे त्याचे वर्णन करा - शैली, मूड, वाद्ये किंवा इतर कोणतेही खास तपशील - आणि AI आपली जादू दाखवेल. तुमची प्लेलिस्ट तयार झाल्यावर तुम्हाला सूचना मिळेल आणि ती मनसोक्त ऐकण्यासाठी प्लेलिस्ट टॅबमध्ये दिसेल.

प्रॉम्प्टची उदाहरणे
“स्वप्नाळू गायन आणि मिनिमल इलेक्ट्रॉनिक बीट्स असलेली निवांत इंडी प्लेलिस्ट, जी मला रिलॅक्स व्हायला मदत करेल.”
“मला रोड ट्रिपसाठी उत्साही कंट्री हिट्स आणि जुन्या आठवणी जागवणाऱ्या सॉफ्ट रॉकचा मिक्स हवा आहे.”
“रात्री उशिरा वाचताना ऐकण्यासाठी ॲम्बियंट आणि निओ-सोल ट्रॅकचे मनाला सुखावणारे मिश्रण.”

तुमच्या व्हाइबला साजेशा गाण्यांचे अगदी हवे तसे मिश्रण मिळवण्यासाठी वेगवेगळे प्रॉम्प्ट वापरून पाहा. तुम्हाला जोशपूर्ण ट्रॅक हवे असोत किंवा निवांत चिल-आउट धुना, AI प्लेलिस्ट जनरेटर तुमच्यासाठी खास निवडलेली गाणी अगदी एका टॅपवर देईल. संगीताचा आनंद घ्या!

भाषा